आंबी, दि. 06 : परंडा तालुक्यातील आनाळा येथील एका सोने-चांदीच्या दुकानातून आज शुक्रवार पहाटेपूर्वी रोख रक्कमेसह सोने-चांदीचे दागिने असे मिळून तब्बल सव्वा दोन लाखाचे ऐवज अज्ञात चोरटयाने चोरुन नेले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लता अशोक चिंतामणी, रा. आनाळा, ता. परंडा यांच्या आनाळा येथील ‘कालिका ज्वेलर्स’ या दुकानाच्या पाठीमागी दरवाजाचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 05 व 06.11.2020 रोजीच्या मध्यरात्री तोडून दुकानातील 5 कि.ग्रॅ. चांदीचे दागिने- वस्तु, 5 ग्रॅम सोने- चांदीचे दागिने व मोल्यवान खडे तसेच 28,000/-रु. असा एकुण 2,18,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या लता चिंतामणी यांनी आज दि. 06.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा आंबी पोलीस ठाण्यात नोंदवला आहे.