उस्मानाबाद, दि. 06 : सहा वर्षे उपसंचालक म्हणून काम करणाऱ्या यशवंत भंडारे यांची उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.
सन 2014 मध्ये यशवंत भंडारे यांना अकरा महिन्याकरीता तात्पुरते पदोन्नती देण्यात आली आहे. भंडारे यांच्याकडे लातूर विभागाचे माहिती उपसंचालक पदाचा पदभार होता. तसेच बहुतांश वेळा वेळा औरंगाबाद माहिती उपसंचालक म्हणूनही अतिरिक्त पदभार भंडारे यांना देण्यात आला होता. केवळ ११ महिन्यासाठी देण्यात आलेली तात्पुरती पदोन्नती तब्बल सहा वर्षे सुरु होती. सहा वर्षानंतर त्यांची रिक्त असलेल्या उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे.