तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील पर्यायी रस्त्याच्या बाजूला गटार बनवली असुन गटारीचे काम राहील्याने तेथील पर्यायी रस्त खचून मोठा खड्डा पडल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

तामलवाडी गावामधून राष्ट्रीय राजमार्ग गेला असल्याने गावातील नागरीकांना ये जा करण्यासाठी दोन्ही बाजूंना पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला सांडपाणी व पावसाचे पाणी जाण्यासाठी गटारीची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतु या गटारी काही ठिकाणी उघड्याच ठेवून तसेच गावातील गटारीची कामे अर्धवट सोडून संबंधित ठेकेदार गायब झाले आहेत.महावितरणच्या समोरील बाजूस अशीच गटार उघडी असुन त्या लगतच्या पर्यायी रस्त्याखालील माती, रस्त्याचे डांबर निघुन जात असुन हळूहळू रस्ता अरूंद होत चालला आहे. 

गावामधुन सोलापूर तसेच कामानिमित्त जाणारे नागरीकांना या खराब रस्त्याचा सामना करावा लागत असुन एखादी दोनचाकी, चारचाकी गाडी खड्ड्यात पडुन अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.अशी अर्धवट कामे सोडून संबंधित ठेकेदार गायब झाले असुन नागरीकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.लवकरात लवकर हा खचत असलेला रस्ता दुरुस्त करून अर्धवट असलेल्या गटारीची कामे पूर्ण करावीत अशी मागणी ग्रामस्थांमधुन होताना दिसत आहे. 

उघड्या गटारीमध्ये टाकत आहेत मटनाची घाण

महावितरण ऑफीसच्या समोर पर्यायी रस्त्यालगत गटारीचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने या उघड्या गटारीमध्ये चिकन सेंटर चालवणारे कापलेल्या कोंबडीची टाकाऊ घाण टाकत असल्याने तिथ दुर्गंधी पसरत आहे. कापलेल्या कोंबडीची घाणीची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थांमधुन होत आहे.


 
Top