काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील गाटे गल्ली येथील शिव छत्रपती बाल मंडळातील चिमुरड्यांनी दिपावली निमित्त रविवार दि. 15 रोजी रायगड व रांजणगड किल्ल्याची कलाकृती तयार करून ऐतिहासिक वारशांची जपणूक करण्याचा संदेश दिला आहे.
दत्तात्रय गाटे व काकासाहेब रोडे यांच्या घरासमोर करण गाटे, विजय गाटे, संस्कार गाटे, ओंकार गाटे, शुभम गाटे, समर्थ मासाळ, रविराज गुंड, कु.सायली गाटे, कु. साक्षी गाटे, कु. भक्ती गाटे, कु. भारती गाटे, ओम रोडे, राज शिंदे, बाळराजे लेंगरे, कु. ज्ञानेश्वरी लेंगरे, कु. ईश्र्वरी लेंगरे, साई गुंड आदींनी शिवकालीन रांजनगड व रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे. त्यात दक्षिण मुखी हनुमान मंदीर , छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती, पाण्याचा तलाव, भगवे झेंडे, हत्ती, सिंह, तोफ, मावळे, गडावर जाणाऱ्या पायऱ्या, आकर्षक रंगरंगोटी, त्याच प्रमाणे आकर्षक असे प्रवेशद्वार साकारले आहे. किल्ला बनविण्यासाठी दगड , माती, शेण आदींचा उपयोग करुन पर्यावरण रक्षणाचाही विचार साधलेला आहे. काटीसह परिसरातून या चिमुरड्यांचे कौतुक होत आहे ,किल्ला पाहण्यासाठी जिज्ञासू व इतिहासप्रेमीं नागरिकांची गर्दी होत आहे.