जळकोट : मेघराज किलजे 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून केंद्र शाळा, होर्टी (ता.तुळजापूर)येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचा विद्यार्थी शिवतेज माळी याला देण्यात आले.

१४ नोव्हेंबर व दिपावली निमित्त ऐतिहासिक प्रसंगाचे जतन म्हणून किल्ले बनवने ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी  सरपंच संजय गुंजेटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष मोरे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक अरुण अंगुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पंडीत नेहरु यांच्या जीवनावर मुलांनी भाषनं केली. आभार व सुत्रसंचलन बसवराज माशाळकर यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी माळी, मारुती कोरे ,विजयकुमार चव्हाण, बी.डी.चव्हाण,व्यकंट कोळी, हरिभाऊ कळबंडे, नितीन बैईनवाड, विजयकुमार कदम, सचिन सगर यांनी प्रयत्न केले.

 
Top