अचलेर, दि. 17 : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील रहिवाशी माजी सैनिक सुरेश बाबुराव सावरे वय ६० वर्षे यांचे सोमवार दिनांक १६ रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी २ वाजता अचलेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.