तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथे माळरानावर राजमुद्रा दूध डेअरी सुरू असुन या दुध डेअरीचे अध्यक्ष गोविंद नरहरी कदम यांचा शेतक-यांना दिलासा दिल्याबद्दल दुध उत्पादक शेतकरी यानी कदम यांचा सन्मान केला. 

देवकुरळी व पिंपळा (खुर्द) या दोन्ही गावाच्या मध्ये माळावर डेअरीची स्थापन केली. या दुधडेअरीमुळे परीसरातील देवकुरळी ,पिंपळा खुर्द, धोत्री, पिंपळा बुद्रुक, गंगेवाडी या गावातून दुध उत्पादक शेतकरी सध्या दूध संकलन करीत आहेत.दररोज या डेअरीमध्ये  गाय व म्हशीचे मिळून ७00 लिटर दुधाचे संकलन होत आहे.  नोव्हेंबर महीन्यापासुन चालूला कदम यानी म्हशीच्या दुधाला सात रुपये फॅट प्रमाणे दर चालू केला आहे.तसेच गाईच्या दुधाला फॅट ३:५.एस एन एफ ८:५  २५ रुपये दर चालू केला आहे.

पिंपळा खुर्द व देवकुरूळी या दोन्ही गावच्या मध्ये दुध डेअरी चालू झाल्याने परीसरातील दुध उत्पादक शेतकर्यांचा शहराकडे जाण्याचा खर्च वाचत असुन भावही चांगला मिळत असल्याने शेतकर्यामधुन समाधान व्यक्त त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे. कोरोना महामारी व अतिवृष्टी या दोन्ही संकटात सापडलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे राजमुद्रा दुध डेअरीचे अध्यक्ष कदम यांनी बोलताना सांगितले.दि. १६ रोजी दिपावलीचे निमित्ताने सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी गोविंद कदम यांचा फेटा पुष्पगुच्छ, हार घालून सन्मान केला. 

यावेळी पिंपळा खुर्द व परीसरातील सर्व दुध उत्पादक शेतकरी व मित्र परिवार व हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 
Top