नळदुर्ग, दि. 17 : नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार दि. 16 नोव्हेंबर रोजी शहरातील गरीब, गरजू व निराधार माता-भगिनींना जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जनहित कक्ष व विधी विभाग तालुकाध्यक्ष अॅड. मतीन बाडेवाले, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी यांच्या सह संदीप वैद्य, अमीर फुलारी, मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.