उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील क्रांतिवीर   लहुजी साळवे चौक येथे  लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी उस्मानाबाद जिल्ह्याच्या  वतीने क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  प्रारंभी  क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे  यांच्या प्रतिमेचे पुजन लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल  सगट याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेना  विद्यार्थी आघाडीचे  जिल्हा उपाध्यक्ष तानाजी  कांबळे  ,   तालुकाध्यक्ष वैभव  एडके , संतोष  हनुमंते , तालुका सचिव स्वप्नील  देडे , बाळू  पाटोळे  लहुजी शक्ती सेना चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

 
Top