तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे दि.१७ मार्च पासुन भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. राज्य सरकारकडून  दि. १४ नोव्हेंबर रोजी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांना दररोज ४००० भाविकांना प्रवेश देण्यात येणार असे आदेशाचे परिपञक श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान जाहीर केले आहे. 

यामध्ये शासनाच्या आदेशानुसार अटी शर्थी नुसार प्रति दिन चार हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मंदीरात प्रवेश करण्यापुर्वी भाविकांना प्रवेश पास घेणे बंधनकारक राहणार आहे. तोडांस मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य राहणार आहे. ऑनलाईन प्रवेश पास www.shrituljabhavani.org या मंदीराच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होणार असुन आँफलाईन पास वितरणाची सोय श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय नळदुर्ग रोड तसेच घाटशीळ रोड वरील १०८ भक्त निवास परिसर तसेच जुने बसस्थानक तुळजापुर व मंदीराच्या प्रशासकीय ईमारती मधील तळमजला या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच सशुल्क दर्शनाचे पास वितरण करण्याची व्यवस्था मंदीराच्या प्रशासकीय इमारती तळमजला येथे करण्यात येणार आहे.

श्री देवीजीचे दैनंदिन नित्योपचार पुजा या सध्या चालू आहेत त्याच प्रमाणे दररोज होणार आहेत. त्याचबरोबर श्री देवीजीस दोन्ही वेळेस एकच अभिषेक पुजा घालण्यात येणार असुन इतर भाविकांचे अभिषेक पुजा, सिंहासन पुजा, गोंधळ, जावळ, गाभाऱ्यात ओटीभरण या पूजा स्थगित ठेवण्यात आलेल्या आहेत. तिन्ही गाभाऱ्यात केवळ पाळीवाले पुजारी यानांच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच श्री देविच्या मुख्य गाभाऱ्यात कोणत्याही भाविकास प्रवेश दिला जाणार नाही. मंदीरात प्रवेश करण्यापुर्वी प्रत्येक भाविकांचे तापमान व आँक्सीजन तपासले जाणार असुन ६५ वर्ष वयाचे पुढील वृद्ध, गरोदर महिला भगिनी व १० वर्षाच्या आतील वयाचे बालक व गंभीर आजारी व्यक्तीना मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना अर्पण करावयाच्या रोख व वस्तु स्वरूपातील देणगी स्विकारण्याची सोय मंदीराच्या धार्मिक कार्यालयात देणगी काँऊटवर केलेली असुन भाविकांनी त्याना अर्पण करावयाची रोख रक्कम अथवा वस्तु रितसर कार्यालयात जमा करुन पावती घ्यावी. 

श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर पहाटे १ वाजता उघडण्यात येणार असुन चरण तिर्थ पुजे नंतर ४ वाजे पर्यत आधार कार्ड दाखविल्यानतंर शहरातील स्थानिक व्यक्तीना पास घेवुनच दर्शन मंडपाच्या रांगेतुन प्रवेश दिला जाणार आहे. पहाटे ५ ते राञी ९ पर्यत इतर भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.  मंदीरात प्रवेश दिल्यानंतर भाविकांनी श्री देवीचे दर्शन झाल्यानंतर तात्काळ मंदीराच्या बाहेर पडावे श्री देवी भक्तांनी मंदीर प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदीरात येणारे प्रवेश संख्येचा विचार करता जास्ती जास्त संख्येने भाविकांनी तुळजापुर शहरात गर्दी करुन स्वताची गैर सोय होऊ देवू नये, असे आवाहन भाविकांना मंदीर प्रशासना मार्फत कळविण्यात येत आहे.

 
Top