तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणांचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शनिवार दि. १४ रोजी सायंकाळी दिपावली सणाचा प्रमुख आकर्षक असलेला भेंडोळी उत्सव पारंपरिक पद्धतीने यंदा प्रथमच भाविकाविना साजरा करण्यात आला.
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरामागे उंच डोगंरावर ऐतिहासिक अतिप्राचीन काळभैरव नाथ यांचे मंदीर असणाऱ्या मंदीरातुन प्रत्येक वर्षी दिपावली सणाच्या अमावश्येस अनादीकाळापासुन चालत आलेल्या रुढी पंरपंरे नुसार श्री काळभैरव नाथ मंदीरात भेंडोळी उत्सवाचे शनिवारी सायंकाळी भेडोंळी उत्सवाची विधीवत पुजा करुन भेंडोळी प्रजविलीत करण्यात आली. या भेंडोळी उत्सवा दरम्यान दशअवतार मठाचे महंत माऊजीनाथ महाराज आदीसह महंत, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विशाल रोचकरी, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, काळभैरव नाथाचे पारंपारिक पाळीचे पुजारी रंगनाथ नवनाथ, पुजारी नागनाथ पुजारी, लिंबाजी पुजारी, सोमनाथ पुजारी, वैजिनाथ पुजारी, प्रकाशनाथ पुजारी, श्री निवास पुजारी गणेश पुजारी, महेश पुजारी, कृष्णा पुजारी, तानाजी पुजारी, सुनिल पुजारी, मुकूल पुजारी उपस्थित होते.
यानंतर पेटती ज्वालामुखी भेंडोळी पारंपरिक वाद्याच्या गजरात संभळाच्या निनादात वाजत गाजत छत्रपती श्री शिवाजी दरवाजामधुन श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात भेंडोळीचे आगमन झाले. श्री देवीच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करुन पेटती भेंडोळी श्री देवीजीस दर्शन दिले. मंदीरात प्रदक्षिणा मारुन भेडोंळी राजे शहाजी महाद्वार बाहेर पडली. या ठिकाणी शहरातील नागरीकांनी भेंडोळी चे दर्शन घेतले. यानंतर आर्य चौक मार्गे कमानवेस हनुमान मंदीर या ठिकाणी विसावा घेऊन पेटत्या भेंडोळीस येथील क्षिरसागर घराण्याकडून पाच पाण्याच्या भरलेल्या घागरीने शांत करण्यात आले.
श्री तुळजाई नगरीत भेंडोळी उत्सव पाहण्यासाठी शहरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. श्री तुळजाभवानी मातेचे महंत दशअवतार मठाचे महंत माऊजीनाथ महाराज यांचा सत्कार मंदीर संस्थानच्या वतीने करण्यात आला.