उस्मानाबाद, दि. 06 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 55 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.  तसेच आज दिवसभरात 134 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 11 इतकी झाली आहे. यातील 14 हजार 93 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 343 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 375 जणांवर उपचार सुरु आहेत.






 
Top