नळदुर्ग, दि. 06 : मौजे खुदावाडी ता. तुळजापूर येथील सरपंच शरद नरवडे, उपसरपंच पांडुरंग बोगरगे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नातून  5 टक्के अपंग निधी गावातील एकूण 26 अपंग व्यक्तींना प्रत्येकी 1000  रु प्रमाणे  26 हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी  सरपंच शरद गणपतराव नरवडे, उपसरपंच पांडुरंग बोगरगे, ग्रा. प. सदस्य शेकाप्पा सालगे, पंडित कबाडे, शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगमेश्वर चिंचोले, प्रा. संतोष सांगवे, सोमनाथ कापसे, नरवडे श्रीधर, प्रहार संघटनेचे दत्ता पाटील, सचिव गणेश धबाले यांच्याकडे अपंग निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या अपंग व्यक्तींना धनादेशाचे वाटप केल्यामुळे अपंग व्यक्तीमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  

 
Top