जळकोट, दि. ८ : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सौ. संगव्वाबाई नारायण पटणे (वय - ७२ ) यांचे रविवार दि. ८ रोजी दुपारी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर हंगरगा नळ रोडलगत स्वतःच्या शेतात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी चौकातील संतोष कृषी सेवा केंद्राचे मालक सतीश पटणे व औरंगाबाद हायकोर्टाचे वकील ॲड. संतोष पटणे यांच्या मातोश्री तर ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नारायण पटणे यांची पत्नी होत.