अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून अलीकडे ओळखले जात आहे. या गावाने भारतीय सैन्य दलात जवळपास आजी-माजी मिळून 70 ते 80 जणांना सैन्यदलात पाठविले आहे.
गावांतील अनेक जण सेना दलात सेवा करून निवृत्तही झाले आहेत.परंतु गेल्या पाच वर्षात गावांतील जवळपास अनेक युवक सैन्यदलात भरती होऊन अचलेर चे नाव दिल्ली च्या तख्तावर कोरले आहेत.
याचाच प्रत्यय आज घडीला येथे पाहण्यास मिळाला.एकाच वेळी तीन युवकांची सैन्यात निवड झाली आहे. यामुळे अचलेर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
फेब्रुवारी महिन्यात बीड येथे झालेल्या सैन्य भरती मेळाव्यात येथील तीन युवक म्हणजे श्रीकांत इरणाप्पा कमलापुरे,विनोद राजकुमार पाटील आणि संदीप काशीनाथ माने या तिघांनी मैदानी चाचणी मध्ये यश मिळविले होते.या तिघांच्या लेखी चाचणी चा निकाल लागला असून त्यांनी सैन्य दलाकडून बीड येथे घेण्यात आलेल्या भरतीत बाजी मारत रणांगण जिंकले आहेत.त्यामुळे त्यांची निवड सैन्य दलात झाली आहे. अचलेर गावचे अनेक जण सध्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत.परंतु या तिघांनी एकदम च भरती होऊन अचलेर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अतिशय कष्ट घेऊन आणि सतत मैदानी सराव करत यांनी हे यश मिळविले आहेत.त्यांचे सैन्य दलात भरती होणे म्हणजे अचलेर गावची शान आणखीनच वाढली आहे.
अचलेर व पंचक्रोशीतून या युवकांचे तर अभिनंदन होतच आहे. पण गावचे नाव ही होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये ही समाधान आणि आनंद दिसून येत आहे. कष्ट व चिकाटी आणि सराव या जोरावरच आम्ही हे यश मिळविले आहोत असे या तिघा युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.