किलज : राम जळकोटे

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील ३ तरुणांनी आपल्या कठीण परिश्रमाने भारतीय सैन्य दलात भरती झाले आहेत.

यापूर्वी किलज गावातील तरुण वर्ग हा या देशसेवेच्या खात्यात काम मोठ्या उत्साहाने करत आहे. गावातील तरुणाईचा कल हा देशसेवेसाठी जास्त आहे. यापूर्वी ही गावातील माजी.सैनिक आहेत.या किलज गावातील एकदाच तीन तरुणांच्या भरती होण्याने गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर  वेगळाच आनंद दिसून येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सैन्य भरती मेळाव्यात किलज येथील तीन युवक शिवशंकर कुठार, हरिबा शिंदे, शंकर निर्मळे यांनी मैदानी चाचणीमध्ये यश मिळवले होते.या तिघांच्या लेखी चाचणी चा निकाल आला असून हे तिन्ही युवक भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी पात्र ठरले आहेत. निवड झालेल्या तिन्ही युवकांचा तसेच किलज गावातील महेश कुठार यांचे भाचे अमोल जेवळे यांनी वैदकीय क्षेत्रात लागणाऱ्या एमबीबीएस या परीक्षेत चांगले गुण मिळवून शासकीय महा विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून पात्र ठरला आहे.

दि.२३ नोव्हेंबर रोजी किलज गावातील रहिवासी तसेच मुंबई मुख्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले.एन. जी. कुठार यांनी सत्कार करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील ज्ञानेश्वर कुठार, किलज गावचे पोलीस पाटील तानाजी मरडे, गावचे चेअरमन पंडित जळकोटे, गावातील अभिनेता प्रविण कुठार, गुंडू मुळे, महेश कुठार, गणेश कुठार सह आदी ग्रामस्थ आणि युवक वर्ग उपस्थित होता.

 
Top