तुळजापूर, दि. 27 : श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी वसंतराव नरसिंगराव कदम पाटील वय वर्षे ९५ रा.तुळजापुर यांचे गुरुवार दि.२६ रोजी रात्री 9. 45 वाजता वृद्धापकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. वसंतराव पाटील हे काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे सख्खे चुलते होत. शुक्रवारी सकाळी ११/३० वाजता जिजामाता नगर येथील पाटील घराण्याच्या स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
