तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मंदीरात संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या ८ महिन्यापासुन भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. शासनाच्या आदेशानुसार दि. १४ नोव्हेंबर दिपावलीच्या पाडव्यापासुन श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. संसर्गजन्य कोरोनाचा पादुर्भाव वाढु नये म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानकडून दिवसातुन चार ते पाच वेळा श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात स्वच्छता मोहिमे बाबत विशेष काळजी घेतली जात आहे.
संपुर्ण मंदीर परिसरात सँनिटायझर फवारणी, सोडीयम हँड्रोक्लोरीक करुन मंदीरात स्वच्छता केली जात आहे. तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दररोज थर्मामिटर तपासणी व हातावर सॅनिटायझर वापर करुन तोंडाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या दररोज पाच ते सहा हजार भाविकांना श्री देवीच्या दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. तसेच पेड दर्शनासाठी १ हजार भाविकांना सोडण्यात येत आहे. तसेच शहरात ठिक ठिकाणी ॲक्सीस पासची यंत्रणा राबविली आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात पुजारी वर्गाना स्वतंत्र गेट ची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पुजारी वर्गातुन वारंवार केली जात आहे. परंतु मंदीर संस्थानचे अधिकारी टोलवा टोलवी चे उतरे देत आहेत त्यामुळे पुजारी वर्गातुन मंदीर संस्थान बाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या धर्मदर्शन रांगेमधुन पुजारी वर्गास भाविका बरोबर जावे लागत आहे. तरी मंदीर संस्थान कडून पुजारी वर्गाच्या ही भावना जपल्या पाहिजेत, अशी मागणी भाविका मधुन होत आहे.
