तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या नगरीत सध्या शहरातील रस्त्यावर श्री देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर सध्या मोकाट जनावराचा मोठा वावर वाढत चालला आहे. या मोकाट जनावरांकडून भाविकांच्या व नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण होवू शकतो या मुळे नगरपालिका प्रशासनाकडुन आदेश पशु पालकांना दि.१९ रोजी जनावरांच्या वावरावर प्रतिबंध घालणारा आदेश काढण्यात आला होता मात्र शहरात तो आदेश कागदावरच राहिला का? अशी उलट सुलट चर्चा शहरातील नागरीकामधुन केली जात आहे.
सध्या दिपावलीच्या सुट्या असल्यामुळे शहरात गर्दीचे प्रमाण वाढले आहे या मोकाट जनावरामुळे शहरातील नागरीकांना व श्री देवी दर्शनास आलेल्या भाविकांना धोका निर्माण होवू शकतो. तरी मोकाट जनावराचा न.प.ने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीक व भाविकांमधुन केली जात आहे.
