नळदुर्ग : एस.के.गायकवाड
जि.प. प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे घरपोच वाटप करण्यात आले.
लाँकडाऊन मुळे शाळा बंद पण शिक्षण चालू या अभियाना अंर्तगत आँनलॉईन शिक्षण चालू आहे. तसेच आँनलाईन शिक्षणाच्या आडचणी लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळा बंद पोषण आहार चालू असे म्हणत शालेय पोषण आहार अभियाना अंर्तगत शालेय विद्यार्थ्याना पोषण आहार घरपोच वाटप करण्यात येत आहे.
दि. १० ऑक्टोबर रोजी जि.प .प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अभियाना अंर्तगत माहे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० या तिन महिन्याच्या कोट्यातील तांदूळ, मसूर दाळ, मटकी दाळ,आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी सहशिक्षक तानाजी लोहार, सहशिक्षिका एम.आर.चौधरी, मिराबाई बिराजदार सह पालक उपस्थित होते.