उस्मानाबाद, दि. 12 : उस्मानाबाद (श.) पो.ठा. गु.र.क्र. 320 / 2006 भा.दं.सं. कलम- 307, 395, 353, 332, 333, 147, 148, 149, 435, 427 दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी- सनी भागवत धावारे, वय 30 वर्षे, रा. शाहूनगर, उस्मानाबाद हा गेली 14 वर्षे पासून गुन्हा तपासकामी पोलीसांना हवा होता. सदर गुन्हा तपासारदम्यान मिळालेल्या खबरेवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने त्यास दि. 12.12.2020 रोजी उस्मानाबाद शहरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.