तामलवाडी, दि. 12 : इमाम युनूस सय्यद, रा. सावरगांव, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 10 व 11.12.2020 रोजीच्या रात्री तोडून घरातील 5 ग्रॅम सोन्याचे दागिने, सुटकेस-3 नग व 20,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 46,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या इमाम सय्यद यांनी दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी, दि. 12 : अनिता धनंजय खताळ, रा. सावरगांव, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 06 ते 11.12.2020 रोजीच्या कालावधीत तोडून घरातील 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू असा एकुण 26,500 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अनिता खताळ यांनी दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर, दि. 12 : संतोष भिमराव यादव, रा. वेताळनगर, तुळजापूर यांनी राहत्या घरासमोर ठेवलेली होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 7183 ही दि. 10.12.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष यादव यांनी आज दि. 12.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्व्ये गुन्हा नोंदवला आहे.

आनंदनगर, दि. 12 : महेश शिलम, रा. सांजारोड, उस्मानाबाद यांची बजाज कंपनीची विक्रांत मॉडेल मो.सा. क्र. टी.एस. 07 एफएम 4512 ही राहत्या घरासमोरुन दि. 09.12.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेश शिलम यांनी आज दि. 12.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्व्ये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top