चौसाळा, दि. १२ : बीड तालुक्यातील चौसाळा येथे कोरोनामुळे कित्येक महिन्यापासून बंद असलेल्या शाळा ह्या आत्ता कुठे विद्यालयीन स्तरावर सुरू झालेल्या आहेत.
12 -12- 2012 या दिवशी विश्वराज नाईकवाडे यांचा जन्म झाला. या दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षे नेहमीच आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त काहीना काही सामाजिक विधायक कार्यक्रम राबवून वाढदिवसाचे महत्व अधोरेखित करणारे चौसाळा येथील पत्रकार विकास नाईकवाडे यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा येथे विद्यार्थी शिक्षकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे.
तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वारंवार सॅनिटायझर उपयोगात यावे म्हणून 15 लिटर सॅनिटायझर मुख्याध्यापक पोपट गोसावी सरांकडे बर्थडे बॉय चिरंजीव विश्वराज विकास नाईकवाडे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकवृंदाचे फुल व मास्क देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्टीत नागरिक सरपंचपती मधुकर तोडकर, ग्रामपंचायत सदस्य अतुल शिंदे, गौतम आप्पा नाईकवाडे ,संदेश खिंवसरा, अशोक जोगदंड, काकड, तोताडे, भोसले, चव्हाण , वाघमारे, गोरे, हम्पे मॅडम आदी जण कोरोनाचे सामाजिक नियम पाळून हजर होते. सर्व शिक्षकवृंदानी ही विश्वराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांचे आभार पत्रकार विकास नाईकवाडे यांनी मानले.