जळकोट ,दि.१२ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यादव मसाजी गायकवाड यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि११रोजी निधन झाले . त्यांच्यावर जळकोट येथील निर्वाण भुमीत बौध्द धम्म पध्दत्तीने दि १२ डिसेबर (शनिवार ) रोजी सकाळी १० .३० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी गावातील व परिसरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व सामाजीक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . त्यांच्या पश्चात पत्नी ,चार मुले, एक मुलगी ,सुना नांतवंडे ,परतंडे असा परिवार आहे.