नळदुर्ग, दि. 12 : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरीविरोधी विधानाचा नळदुर्ग येथे शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी शिवसेनेच्यावतीने निषेध करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलमध्ये प्रचंड दरवाढ करुन शंभर रुपयेच्या जवळपास प्रतिलिटर भाववाढ करुन सर्वसामान्यांच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले असून केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, त्याचबरोबर न्याय हक्क मागण्यांकरीता दिल्लीत आंदोलन करणा-या शेतक-याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांच्या आंदोलनामध्ये चीन व पाकिस्तान यांचा हात असल्याचे संबोधून शेतक-यांना अपमानित केले आहे. शेतक-यांचा अपमान करणा-या दानवे यांचा तुळजापूर तालुका शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
निवेदनावर माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शाम पवार, तुळजापुर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, सुधीर कदम, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, सुनिल जाधव, प्रदीप मगर, राजेंद्र जाधव, शाम कनकधर, ज्ञानेश्वर घोडके, बाळासाहेब शिंदे, राजअहमद पठाण, जितेंद्र माने, कृष्णात मोरे, यशवंत पाटील, सुरज साळुंखे, सचिन मोरे, नेताजी महाबोले, सुनील गव्हाणे, बाळासाहेब वाघमारे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.