तुळजापूर, दि. २९ : डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते विशेष तुळजापुरला आले होते.
भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख,लातूर जिल्हा भाजपा अध्यक्ष गुरुनाथ मगे या नेत्यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तुळजाभवानी देवीचे पुजारी आणि भाजपा तालुका सरचिटणीस विकास मलबा यांनी त्यांची पूजा केली आणि त्यांना शुभ आशीर्वाद दिला. यावेळी तुळजापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद पानपुडे, गुलचंद व्यवहारे, इंद्रजित साळुंखे, विषाल रोचकरी, सागर कदम आणि देवीचे पुजारी अतुल मलबा यांची उपस्थिती होती.
दर्शन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तुळजाभवानी मंदिर प्रशासन कार्यालयात माजी ऊर्जामंत्री बावनकुळे मराठवाडा संघटक देशमुख आणि लातूर जिल्हाध्यक्ष मगे यांच्याशी अनौपचारिक बातचीत केली.