तुळजापूर दि २९ : डॉ. सतीश महामुनी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेतामध्ये पातळ जाण्याचे प्रकार बंद करावेत त्यामुळे जमिनीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते असे उद्गार शेती शास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमोले यांनी काढले.
तुळजापूर येथील प्रगतिशील शेतकरी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या उत्पादक शेतकरी मेळाव्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्री प्रमुख सुरेश कबाडे, शास्त्रज्ञ संचालक डॉक्टर अंकुश चोरमोले, संचालक अमोल पाटील, प्रगतिशील शेतकरी विजय मगदूम यांची या यावेळी उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी ग्रुप च्या वतीने प्रमुख मार्गदर्शक यांचे स्वागत उमेश ताकभाते, राजाभाऊ देशमाने मुकुंद कदम आणि श्रीनिवास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
उसावरील कीड व रोगाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ डॉक्टर अंकुश चोरमोले यांनी ऊस उत्पादक शेतकरी सतत वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असतो तांबेरा रोग पडल्यानंतर पानांवर पडणारे तपकिरी ठिपके , हुमनी या आदर्श रोगाबाबत घ्यावयाची काळजी, शेतामध्ये असणारे वारूळ संदर्भात खबरदारी, पांढरी माशी असल्यामुळे होणारे उसावरील दुष्परिणाम, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
एक एकर रानामध्ये पाच मेट्रिक टन पाचट निर्माण होते या पथकाला शेतामध्ये झाल्यानंतर मातीमधील सर्व शेतीसाठी उपयुक्त घटक नष्ट पावतात याकडे डॉक्टर चोरमोले यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आणि हे पाचट कुट्टी करून शेतामध्ये टाकल्यास त्याचा चांगला उपयोग होईल असे सांगितले.
पहिल्या सत्रामध्ये गन्ना मास्टर ऍग्रो एजन्सी चे प्रमुख सुरेश कबाडे यांनी मार्गदर्शन करताना सुरू आणि खोडवा याविषयी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. ऊस शेतीच्या संगोपन मध्ये पाचट काढण्याची पद्धती त्यांनी शेतकऱ्यांना उलगडून सांगितली उसाची दबाई करणे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत समाधानकारक उत्तरे दिली याप्रसंगी प्रायोजक वसुंधरा ऑर्गानिक व्यवस्थापक श्री प्रदीप कदम, संयोजन समिती मधील श्री उमेश ताकभाते, संजय जाधव नानासाहेब रोजकरी संतोष डोईफोडे दर्याप्पा मुळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा. विवेक गंगणे यांनी केले
तुळजाभवानीचे पूजन झाल्यानंतर येथील नंदू कदम यांनी कार्यक्रम प्रारंभी शेतकरी गीते सादर केली. व्यासपीठाच्या उजव्या बाजूस वसुंधरा ऑरगॅनिक या सेंद्रिय खते व कीटक नाशके व व औषधेयांच्या उत्पादनात स्टॉल मांडण्यात आला होता.