काटी : उमाजी गायकवाड

मंगरुळ ता. तुळजापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या समाप्तीचे औचित्य साधुन मंगळवार दि. 22 डिसेंबर रोजी समस्त भजनी मंडळाच्यावतीने कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.

मंगरुळ येथील युवक सागर खोपडे, महेश खोपडे, सागर डोंगरे यांनी कोरोना कालावधीत जीवाची पर्वा न करता कोरोना योध्दा म्हणून कार्य केलेल्या सर्व यौध्दांचा समस्त भजीन मंडळाच्यावतीने सत्कार केला. यामध्ये मंगरुळ गावचे पोलीस पाटील लक्ष्मण राजेंद्र माळी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आरोग्य सेविका, ग्रा.पं. कर्मचारी आदींचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भाविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप सुधाकर इंगळे महाराज यांची प्रमुख उपस्थित होती.

 
Top