नळदुर्ग, दि. 6 : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथे कै. राजेंद्र शिवशंकर वाघोले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार दि. 6 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती अशोक पाटील, शिवसेनेचे कृष्णा मोरे, शिवशंक वाघोले, बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश चौगुले, हंगरगा नळचे सरपंच संतोष वाघोले, संजय वाघोले, शिवराज पाटील, मोहन कांबळे, महादेव चौगुले, संगमेश्वर आपशेट्टी, ललीत घंटे, दादा मुदगडे, आदीजण उपस्थित होते.