उस्मानाबाद, दि. 16 : जिल्ह्यातील एका तरुणाचे परजिल्ह्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान त्या युवतीने त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याने युवकाने अनेकवेळा तिच्या मागणीप्रमाणे पैसे, मोबाईल दिले तरीही ती पैशाची मागणी करत होती.
तसेच पैसे न दिल्यास "तुझ्याविरुध्द लैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन तुला कुटूंबीयांसह बरबाद करेन." असे त्या युवकास धमकावत होती. या त्रासास कंटाळून त्या युवकाने दि. 11.12.2020 रोजी आत्महत्या केली. अशा मजकुराच्या मयत युवकाच्या भावाने दि. 15.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.