उस्मानाबाद, दि. 16 : सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे कार्यरत असुन उस्मानाबाद सायबर पोलीस ठाणे हे ऑक्टोबर 2020 मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील इमारतीत सुरु झाले होते. सायबर पोलीस ठाण्याची ही जागा अपुरी पडत असल्याने पोलीस मुख्यालयातील पोलीस पेट्रोलीयम पंपामागील स्वतंत्र इमारतीत हे पोलीस ठाणे स्थलांतरीत करण्यात आले आहे. 





विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद श्री. के.एम.एम. प्रसन्ना यांच्या उस्मानाबाद जिल्हा निरीक्षण दौऱ्याचे औचीत्य साधून त्यांच्या शुभहस्ते आज दि. 16.12.2020 रोजी या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, मा. पोलीस उपअधीक्षक श्री. मोतीचंद राठोड यांसह सायबर पो.ठा. च्या पो.नि. श्रीमती अर्चना पाटील, सपोनि- श्री. सचिन पंडीत, पोउपनि- श्रीमती क्रांती ढाकणे यांसह पोलीस अंमलदार उपस्थित होते.

 
Top