तुळजापूर, दि. 17 : येथील घाटात कापूस घेऊन जाणारा ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. 17 डिसेंबर रोजी पहाटेपूर्वी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, तुळजापुरातील हा सलग दुसरा अपघात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ट्रक क्रमांक एमएच बीई 0584 हा यवतमाळ हुन कोल्हापूर कडे कापुस घेऊन जात होता. भरधाव वेगाने येणारा ट्रक तुळजापुर घाटातील सन ऑफ सन हॉटेल समोर पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र चालक किरकोळ जखमी झाल्याचा अंदाज आहे.

 
Top