उस्मानाबाद, दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020चा कार्यक्रम घोषित केला असून संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 18 डिसेंबर 2020 ते दि. 21 जानेवारी 2021 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

स्मानाबाद जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सभा, मिरवणूका, निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक असल्याने निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी खालील बाबी करण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे. "कोणत्याही प्रकारची मिरवणूक/मोर्चा काढणे,आंदोलन करणे,निदर्शने करणे, उपोषण करणे.कोणत्याही प्रकारची घोषणा देणे,वाद्य वाजविणे,किंवा गाणे म्हणणे इत्यादी. कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे,हे आदेश दि. 18 डिसेंबर-2020 ते 21 जानेवारी-2021 पर्यंत संपूर्ण उस्मानाबाद जिल्हयात अंमलात राहतील.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी सूचित केले आहे.

 
Top