नळदुर्ग : एस.के.गायकवाड

नळदुर्ग येथील बसस्थानक जवळ असलेल्या इंडिया-1 एटीएम मशीन मध्ये घोळ होत असुन पैसे न मिळताच बँक खात्यावरिल रक्कम कपात झाल्याचा मेसेज मोबाईल वर पडत असल्याने ग्राहकामध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. एटीएम द्वारे आर्थिक व्यवहार करावा की नाही अशी द्विधा मनस्थिती ग्राहकात निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १७ डिसेंबर रोजी वागदरी ता. तुळजापूर येथील एक ग्राहक नळदुर्ग येथील बस्थानक जवळ राष्ट्रीय महामार्गालगत नजीकच्या अंतरावर असलेल्या इंडिया-1 या एटीएम मशीन मधुन दिड हजार रुपये काढत असताना पैसे तर मिळालेच नाहीत परंतु रुपये दिड हजार त्यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील बचत खात्यातून रुपये दिड हजार कपात झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. 

त्यांनी संबंधित बँकेसी संपर्क साधला असता बँकेच्या आधिकाऱ्यानी या विषयी लेखी तक्रार लिहून घेतली व पैसे परत खात्यावर जमा होतील असे सांगितले. हे जरी खरे असले तरी एटीएमच्या भरवशावर दुरचा प्रवास करीत असताना अशी समस्या निर्माण झाली तर मोठी आडचण निर्माण होऊ शकते. शिवाय एटीएम वरील आर्थिक व्यवहारीचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे डिजिटल इंडियाचा बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा एटीएम चा आर्थिक व्यवहार नियमित व सुरळीतपणे व्हावा अशी मागणी केली जात आहे.

 
Top