तुळजापूर, दि. १७ : प्रहार दिव्यांग  क्रांती आंदोलन संघटना तुळजापूरच्या वतीने  नायब तहसीलदार जाधव यांना शासन निर्णय क्रमांक २०१३/प्र क्र २८६ नुसार संपूर्ण तुळजापूर तालुक्यातील अपंग ( दिव्यांग) , विधवा, व ६० वर्ष वयोवृद्ध अशा लोकांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करावे यामागणीसाठी निवेदन देण्यात आले

यावेळी तुळजापूर प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार तालुका उपाध्यक्ष मारुती पाटील,  नागनाथ मुळे, स्वराज चाफाकानडे, सचिन लकडे  प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top