तुळजापूर, दि. 16 : महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये लहुजी शक्ती सेना राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत अशी माहिती लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तुळजापूर येथील हॉटेल अशोका येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लहुजी शक्ती सेना चे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी गायकवाड, जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
लहुजी शक्ती सेना आजपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होती मात्र मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी यापुढे राजकीय नेतृत्व करण्यासाठी लहुजी शक्ती सेना ने आपले रणशिंग फुंकले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावांमध्ये लहुजी शक्ती सेना ची शाखा असल्यामुळे तेथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.
ठाणे,धुळे, वाशिम ,नगर, नंदुरबार, सोलापूर,कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, वर्धा, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धुळे, अमरावती, उस्मानाबाद, हिंगोली, यासह एकूण 23 जिल्ह्यामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या मोठी ताकत आहे जवळपास ४हजार ५०० उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील असा दावा करून त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये असणाऱ्या ५८ पोटजातींत लहुजी शक्ती सेना चे नेतृत्व मान्य आहे हा राजकीय पर्याय मातंग समाजासह इतर आठवण समाजाच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक कामगिरी करणारा होणार आहे असे सांगून लहुजी शक्ती सेना लवकरच स्वतंत्र पक्ष म्हणून आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासमोर येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेमध्ये मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या लोकसभेच्या ७ जागा राखीव होत्या मात्र त्यापैकी एकाही पक्षाने एकाही जागेवर मातंग समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली नाही साधी उमेदवारी देखील दिली नाही याची खंत या समाजाला असून ८० लाख संख्येने असणारा हा समाज भविष्यात राजकीय क्षेत्रातील आपली शक्ति प्रस्थापित करून समाजाला न्याय मिळवून देईल त्या अनुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा लहुजी शक्ती सेना ने निर्णय घेतल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.