तुळजापूर, दि. 17 : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कोठावळे यांची उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली मराठी विषय शिक्षक महासंघाचे प्राध्यापक सुनील दिसले सचिव बाळासाहेब माने यांनी त्यांची निवड केली आहे. तसेच इतिहास विषय विभागीय कार्यकारिणीवर व भूगोल विषयाच्या जिल्हा कार्यकारिणीवर प्रा. शिवपुत्र गुरव यांची निवड झाली आहे.
कुलस्वामिनी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक दयानंद सोनटक्के यांच्या हस्ते संतोष कोठावळे व शिवपुत्र गुरव यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी प्रा. सुलक्षणा हराळकर, प्रा.गणेश बिराजदार, प्रा प्रदीप बांडगर,धनाजी कोळेकर, बालाजी कांबळे, रवींद्र उपासे, गेनसिद्ध बिराजदार, शिवशंकर जलकोठे, यु एस पठाण,सचिन कांबळे,बालाजी कोने, अबुजर पटेल,भालेराव सर, बी.के.गुरव, रमेश जाधव, बापू खंडागळे, प्रभाकर टाकणे, राजकुमार मिटकरी धन्यकुमार राऊत,अनिल धोत्रे उपस्थित होते.