तुळजापूर, दि. 17 : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या अंतर्गत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही 42 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेच्या आणि पगारीच्या मागणीसाठी पुकारलेल्या आमरण उपोषण राष्ट्रीय श्रमिक आघाडी चे अध्यक्ष यशवंत भोसले आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रतिनिधी दीपक पलंगे यांनी दिली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरीवर आपले 42 कर्मचारी यांच्यावर मंदिर संस्थांच्या अंतर्गत चालवणाऱ्या एजन्सीकडून अन्य होत असल्याच्या विरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडी सातत्याने पाठपुरावा केला कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने न्यायालयीन लढाई लढुन यश मिळवले त्याचबरोबर कामगार न्यायालय मध्ये देखील कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल मिळाल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेचे आणि वेतनाचे लाभ मिळत असल्याच्या तक्रारीवरून अध्यक्ष यशवंत भोसले, दिपक पलंगे, दिनेश पाटील, दीपक पाटील, आकाश भोसले, गणेश दुरगुडे, माऊली गिरी, दत्तात्रय जगताप, विकास कांबळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी 18 डिसेंबरपासून अमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तशी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली होती.
उपोषणा पूर्वी मंदिर संस्थान चे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांनी संघटनेच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करून त्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक पवित्रा घेतला. संघटनेच्या प्रश्नासाठी विशेष बैठक बोलावून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेमध्ये संघटनेचे समाधान झाल्यामुळे संघटनेने आजपासून सुरू होत असणारे आंदोलन मागे घेतल्याची माहिती संघटनेचे नेते दीपक पलंगे यांनी दिली.