उमरगा : युवक काँग्रेस कमिटीच्या उमरगा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी शमशोदिन जमादार तर उपाध्यक्ष पदी ओंकार मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, तसेच माजी बांधकाम सभापती गोविंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.