सलगरा, दि. 01 : औरंगाबाद विधानपरिषद पदवीधर मतदार संघासाठी तुळजापुर तालुक्यातील सलगरा दिवटी केंद्र क्र. ५७५ या मतदान केंद्रावर १ डिसेंबर रोजी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेत, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मतदान करण्यात आले. 

त्याच पार्श्वभुमीवर मास्क नसणाऱ्याना मास्क देण्याबरोबरच सुरक्षित अंतराचे पालन करत मतदान करण्यात आले.  सर्व मतदारांनी आपला हक्क बजावत, आरोग्य कर्मचारी, मतदान अधिकारी, पोलीस प्रशासन आदींना सहकार्य करत मतदान यशस्वीरित्या पार पाडले.

बुथवर ३०७ पैकी २०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यात १७८ पुरुष तर २६ स्त्रिया असून, टक्केवारी ६६.४५ इतकी झाली आहे.

 
Top