नळदुर्ग : एस.के. गायकवाड

नळदुर्ग ता. तुळजापूर येथे "कांगावा" या मराठी चित्रपटाचा पोस्टर व टिझर लाँचिंग समारंभ सोहळा सोमवारी मोठ्या थाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय आधिकारी सुरेश कांबळे (बुलढाणा) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, अभिनेत्री सेजांली मसंद-ठाकुर (मुंबई), महिमा वाघमोडे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जगदीश राऊत, जी.एम. ग्रुप सोलापूरचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे आदीजण उपस्थित होते. 

या प्रसंगी परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक मारूती बनसोडे, नगरसेवक विनायक अहंकारी, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, अखील भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य संदिपान नाटकर, अभिनेत्री सेजांली मसंद, प्रा.पां डुरंग पोळे, महिमा वाघमोडे आदींची शुभेच्छापर भाषणे झाली. तर सिनेकलावंत सेंजाली मसंद-ठाकूर, भैरवनाथ कानडे, संतोष साळुंके आदींची निवेदक डॉ. संतोष पवार यांनी प्रकट मुलाखत घेतली.

कांगावा चित्रपटाचे लेखक निर्माता दिगदर्शक डॉ. पंडीत गायकवाड, सहाय्यक दिगदर्शक प्रसाद देशमुख यांनी ग्रामीण भारतील कलाकारांना सोबत घेवून अथक प्रयत्न करून हा मराठी चित्रपट निर्माण केला आहे. यावेळी या चित्रपटाचा टिझर चित्रफीत दाखवताच रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी नगरसेवक औदुंबर कदम, बसवराज धरणे, मारूती खारवे, रिपाइंचे दुर्वास बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, एस.के.गायकवाड, पत्रकार सुनिल बनसोडे, विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे यांच्यासह  गितकार, संगितकार, सर्व कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिग्दर्शक डॉ. पंडीत गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. संतोष पवार यांनी केले.

 
Top