ताज्या घडामोडी

 


तुळजापूर, दि. 01 : येथील नगरपरिषदमध्ये पाणीपुरवठा विभागात कार्यरत असणारे कर्मचारी देविदास चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. 

नगरपरिषदेचे पाणी पुरवठा कर्मचारी देविदास चव्हाण हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्या निमित्ताने मुख्याधिकारी आशिष लोकरे व विनोद गंगणे यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी वैभव पाठक, सज्जन गायकवाड, मुजफ्फर शेख, अर्जून माने, ज्ञानोबा टिंगरे, प्रमोद माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 
Top