उस्मानाबाद, दि. 13 : आकाश अर्जुन मगर, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद यांच्या वरुडा गट क्र. 188 मधील पत्रा शेडमध्ये बांधलेली मुर्रा जातीची म्हैस दि. 10 व 11.12.2020 रोजीच्या रात्री अज्ञान व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या आकाश मगर यांनी काल दि. 12.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, दि. 13 : अशोक सुरवसे, रा. केशवनगर, उस्मानाबाद यांनी दि. 11.12.2020 रोजी 20.00 वा. घराबाहेर हिरोहोन्डा स्प्लेंडर प्लस एम.एच 25 व्ही 9473 ही ठेवली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ठेवल्या जागी त्यांना आढळली नाही. अशा मजकुराच्या अशोक सुरवसे यांनी आज दि. 13.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी, दि. 13 : काटी, ता. तुळजापूर येथे गावकरी- योगेश ढगे यांचे पत्रा शेडमध्ये असलेल्या ‘श्री मोबाईल शॉपी’ या फोन दुरुस्ती दुकानाचा पाठीमागील पत्रा दि. 12 व 13.12.2020 दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरट्याने उचकटून आतील दोन जुने फोन, एक नवीन फोन व गल्ल्यातील 1,500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या योगेश ढगे यांनी आज दि. 13.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर, दि. 13 : कल्याणी हुंडेकरी, रा. तुळजापूर या दि. 02.12.2020 रोजी 22.30 वा. तुळजापूर येथील ‘श्रेयस ट्रॅव्हल्स’ च्या बसमध्ये प्रवासास बसल्या होत्या. दरम्यान भावाशी गप्पा करण्यास त्या पर्स आसनावर ठेवून बसमधून खाली उतरल्या असता पर्समधील मोटोरोला मोबाईल फोन बसमधील चालक, वाहक किंवा अन्य प्रवासी यांपैकी कोणीतरी चोरला. अशा मजकुराच्या कल्याणी हुंडेकरी यांनी आज दि. 13.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.