नळदुर्ग, दि. 13 : सुनिल खटके, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर यांचा उसाने भरलेला ट्रक दि. 12.12.2020 रोजी 20.00 वा. गावातून जात असतांना रस्त्यावरील वीज वाहिन्यांचा अडथळा होत असल्याने चालक- बालाजी राठोड याने महावितरण रोहित्राच्या वितरण पेटीतून विद्युत पुरवठा बंद केला. “तुम्ही ट्रक दिवसा का नेला नाही, रात्रीच्या वेळी गावाचा वीज पुरवठा बंद का केला.” असा जाब गावकरी- शिवाजी देवकर, केरबा माने यांनी सुनिल खटके यांना विचारला. याचे पर्यावसान हाणामारीत होउन सुनिल खटके गटांतील 8 सदस्य व शिवाजी देवकर गटातील 6 सदस्यांनी परस्पर विरोधी गटास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या शिवाजी देवकर व सुनिल खटके यांनी परस्पर विरोधी गटांविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top