जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेतर्फे राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त रामतीर्थ व येडोळा येथील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय कृषी दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक व लोहपुरुष  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रामतीर्थ येथील शेतकरी काशिनाथ चव्हाण, शंकर पवार व व येडोळा येथील शेतकरी शिवाजी पवार, मोहन पवार, प्रेमदास चव्हाण, बाबू राठोड, माणिक जाधव, पोमा जाधव आदी शेतकऱ्यांचा शेतकरी दिनानिमित्त श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेच्या अध्यक्ष मेघराज किलजे, शिवराज राचेट्टी, एसबीआय फाऊंडेशनचे कार्यक्रम समन्वयक गुरुदेव राठोड आदींच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. केंद्र शासन व राज्य शासनाच्या कृषीविषयक विविध योजना विषयी माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमास रामतीर्थचे उपसरपंच राम चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राठोड, रोजगार सेवक नेमिनाथ चव्हाण, अर्जुन राठोड, रमेश पवार, बाबू राठोड, काशिनाथ राठोड, सिताराम चव्हाण, किसन चव्हाण, रामतीर्थचे ग्रामसेवक ए. जी. पाटील, येडोळा जि. प. प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक विजयकुमार मर्डे,एस.एस. पवार,टी. आर. पवार आदीसह शेतकरी उपस्थित होते.

 
Top