उस्मानाबाद : शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये राबून अन्नधान्य पिकवतो, या उभ्या जगाचा पोशिंद्याचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे २३ डिसेंबर 'राष्ट्रीय किसान दिन' या निमित्ताने शहरातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, त्यांचे शेती बद्दलचे मत जाणून घेत, त्यांना राष्ट्रीय किसान दिनाच्या शुभेच्छा समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या 'विवेकानंद युवा मंडळामार्फत' देण्यात आल्या. त्याचबरोबर २४ डिसेंबर 'राष्ट्रीय ग्राहक दिन' देखील साजरा करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील असंख्य ग्राहकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमवेत मिळून साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधव, शहरातील नागरिक, तक्रार निवारण मंचचे अधिकारी व कर्मचारी, विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, स्वप्नील देशमुख, महेंद्रप्रताप जाधव, प्रशांत मते आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी अनमोल असे सहकार्य केले.