नळदुर्ग : एस.के. गायकवाड
शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा या मागणी साठी देशपातळीवर चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत अणदूर ता. तुळजापूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाच्या बिलाचा पहिला हप्ता साखर कारखानदारानी पंधरा दिवसाच्या आत द्यावा या प्रमुख मागणी सह अन्य महत्त्वाच्या मागणी साठी शेतकरी संघटनेच्यावतीने संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर अणदूर ता.तुळजापूर बसस्थानका समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी बळी राजा पार्टी, वंचित बहुजन आघाडी सह समविचारी पक्ष व संघटनांनी या आंदोलनास जाहीर पाटींबा दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद घोडके, बळीराजा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मुजीब मकानदार, जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब रोडे, उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष सचिन देडे, आम आदमी पार्टीचे शिवकुमार स्वामी, वंचित बहुजन आघाडीचे मारुती बनसोडे, आर.एस.गायकवाड सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नि.एस.बी.मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.