किलज : राम जळकोटे
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील नदिलगत असलेली घरे ही पाण्याच्या अखंडित प्रवाहाबरोबर वाहुन गेली होती. यामध्ये नदिलगत घरे असलेल्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. यात त्या कुटुंबांना राहण्यासाठी निवारा नव्हता. या पूरग्रस्त कुटुंबाना मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यामध्ये अनेक सामाजिक संघटना ,संस्था, तसेच लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती यांनी या कठीण काळात मोठा आधार देण्याचे काम केले होते.
या कुटुंबाना अजून सुद्धा प्रशासनाची कोणतीही मदत मिळाली नाही. आता हे कुटुंबीय गावकाठी असलेल्या डोंगरावर पत्र्याचे कॅम्प ठोकून स्थयिक झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस महाराष्ट्र राज्य सेलचे सचिव, श्री स्वामी समर्थ जनहित ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सांगवे पाटील यांनी सुद्धा या कठीण काळात या कुटुंबाना आधार देण्याचे काम केले आहे. राजकुमार सांगवे पाटील यांनी पंडित पटणे, बळीबा पटणे,शांतिर पटणे या कुटुंबाना संसार उपयोगी भांडे देऊन माणूसकीचे नाते जपण्याचे काम केले आहे. सांगवे हे सतत सामाजिक कार्यत अग्रेसर असतात ते पुणे येथे स्थायिक असून गावपातळीवरचे प्रश्न ते स्वतः जातीने लक्ष वेधून करीत असतात, गावातील गोरगरिबांसाठी ते जणू एक मोठा आधारच बनले आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य आम्हासाठी मोठा आधार असल्याचे पूरग्रस्त कुटुंबियांनी बोलते वेळी म्हंटले. सांगवे यांनी केलेली मदत त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असेही त्यांनी म्हंटले आहे.
गावातील कोणतेही सामाजिक प्रश्न तसेच इतर कामे करण्यासाठी मी स्वतः लक्ष देत आलेलो आहे. तसेच यापुढेही माझे लक्ष गावपातळीवर सुद्धा असेल.
- राजकुमार सांगवे पाटील,
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स महाराष्ट्र सेल सचिव, श्री. स्वामी समर्थ जनहित ट्रस्ट अध्यक्ष, पुणे.
यावेळी राजकुमार सांगवे, कालिदास जळकोटे, अतुल सांगवे, महेश पोतदार आदी उपस्थित होते.