काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रविवार दि. 6 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते, प्राचार्य सुभाष जाधव,पर्यवेक्षक गणेश हलकरे,सहशिक्षक चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव,योगेश राऊत,सुनील पाटील,चौडापा मसुते,लक्ष्मण धोत्रे, आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.