उस्मानाबाद दि. २ : उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने दर वर्षी दिला जाणारा मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 'शोधवार्ता' व 'उत्कृष्टवार्ता' या दोन गटातील पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गत अकरा वर्षापासून उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात येते आहे. 'उत्कृष्टवार्ता व 'शोधवार्ता' या दोन गटासाठी दैनिकाच्या प्रतिनिधीनी एक डिसेंबर २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधित दैनिकात नावासह प्रकाशित झालेले किंवा नाव नसल्यास संपादकाचे शिफारस पत्र आणि प्रकाशित साहित्याची मुळ प्रत व त्याच्या साक्षांकित तीन प्रति,वार्ताहराचे दोन पासपोर्ट फोटो, पाॅकिटिवर कोणत्या गटासाठी प्रवेशिका पाठवत आहे त्याचा स्पष्ट नामोल्लेखासह २५ डिसेंबर २०२० पर्यंत उदगीर तालुका पत्रकार संघ ,व्दारा दैनिक यशवंत विभागीय कार्यालय, नगर परिषद व्यापारी संकुल ई बिल्डींग पहिला मजला, उदगीर जि. लातूर पिन कोड ४१३५१७ या पत्यावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना 'उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पुरस्कार रोख ५ हजार रुपये स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र,व्दितीय पुरस्कार रोख ३ हजार रुपये स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, तृतिय पुरस्कार रोख २ हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र , शोधवार्ता गटात प्रथम पारितोषक रोख ५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,व्दितीय पारितोषक रोख ३ हजार रुपये ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतिय पारितोषक रोख २ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या अगोदर उदगीर तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी प्रवेशिका पाठवू नये.
मराठवाडा स्तरिय उत्कृष्ट वार्ता व शोधवार्ता पुरस्कारासाठी मराठवाड्यातील पत्रकारांनी आपली प्रवेशिका पाठवावे असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, सचिव दयानंद बिरादार व पदाधिकार्यांनी केले आहे.